Talegaon Dabhade political News : निखिल भगत यांची बिनविरोध नगरसेवक पदाची ‘सेकंड इनिंग’

Talegaon Dabhade political News : निखिल भगत यांची बिनविरोध नगरसेवक पदाची ‘सेकंड इनिंग’

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये इतिहास
Pckhabar-   तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे प्रभाग क्रमांक- 1 मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, युवा नेते निखिल उल्हासराव भगत यांची सलग दुस-यांदा नगरसेवकपदी बिनविराेध निवड झाली आहे. भगत यांच्या बिनविराेध नगरसेक पदामुळे नगरपरिषदेच्या इतिसहासात त्यांची नाेंद झाली आहे. त्यामुळे भाजप, महायुती आणि भगत यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लाेष केला आहे.

तळेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी निखिल भगत यांनी प्रभाग क्रमांक-1 अ मधून भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला हाेता. त्यांचेच समर्थक सामाजिक कार्यकर्ते, ॲड.संविद पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला हाेता. मंगळवारी (दि.18) अर्जाची छाननी झाली. यामध्ये भगत आणि पाटील यांचे अर्ज वैद्य ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिका-यांनी जाहीर केले. त्यानंतर बुधवारी (दि.19) सकाळीच ॲड. संविद पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निखिल भगत यांची बिनविराेध नगरसेवक म्हणून दुस-यांदा निवड झाली आहे.

दरम्यान, 2020 मध्ये सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केेलेल्या सहकार्यामुळे पाेटनिवडणुकीत निखिल भगत प्रथम बिनविराेध नगरसेवक झाले हाेते. त्यानंतर आता पुन्हा एकदा भगत यांना बिनविराेध ऩगरसेवक म्हणून निवडून येण्याचा मान मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

——
”भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमधील राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार मानताे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मला उमेदवारी देऊन जाे विश्वास दाखविला, ताे विश्वास आपण सार्थ ठरवून दाखवू. तळेगाव दाभाडे शहरातील आदर्श प्रभाग कसा असावा, यासाठी आपण कार्यरत राहू. तसेच उमेदवारी जाहीर झाल्यापासून यशवंतनगर प्रभागातील सर्व नागरिकांनी माेठा प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार. ”
– निखिल उल्हासराव भगत, बिनविराेध नगरसेवक, भाजप.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *