Talegaon Dabhade News: श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

Talegaon Dabhade News: श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. संविद पाटील यांची माहिती
Pckhabar- तळेगाव दाभाडे येथील यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त उद्या रविवारी (दि.8) यशवंतनगरमधील बालाजी मंदिरांच्या पाठीमागे विविध धार्मिक कार्यक्रमाचे सकाळी नऊपासून आयाेजन करण्यात आले आहे.

सकाळी नऊ वाजता महाराजांची पूजा, दुपारी साडेबारा वाजता महाआरती, त्यानंतर दुपारी 1 ते 3, व सायंकाळी साडेसात ते रात्री नऊ वाजपेर्यंत महाप्रसाद, साडेपाच वाजता ह. भ. प. शिवशंभुचरित्रकार साेमनाथ महाराज भालेराव यांचे किर्तन हाेणार आहे. त्यांना आळंदी देवाची येथील संत कृपा ज्ञानदान अन्नदान संस्थेचे बाल वारकरी साथ देणार आहेत, अशी माहिती यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. संविद पाटील यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *