Talegaon Dabhade News : दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह 

Talegaon Dabhade News : दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास मार्ग दिंडाेरी प्रणित यांच्या वतीने आयोजन

pckhabar- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास मार्ग दिंडाेरी प्रणित यांच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडेमध्ये अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे 28 नाेव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत आयाेजन केले आहे.

तळेगाव दाभाडे, समर्थनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरासमाेर हा सप्ताह हाेणार आहे. यानिमित्त आठ दिवस सामुदायिक गुरूचरित्र वाचन, श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक, पुजा, भुपाळी आरती, नैवेद्य आरती, विशेष याग, स्वामी चरित्र आणि दुर्गा सप्तशती वाचन, ग्राम अभियान अंतर्गत 18 विभागांचे मार्गदर्शन, औदुंबर प्रदक्षिणा, नित्यध्यान, गीतेचा 15 वा अध्याय आणि विष्णूसहस्त्रनाम वाचन असे विविध दैनंदिन कार्यक्रम हाेणार आहेत.

त्याचबराेबर नित्यस्वाहाकार, श्री गणेश याग, मनाेबाेध याग, गीताई याग, श्री स्वामी याग, श्री चंडी याग, श्री रूद्र याग, मल्हारी याग, बलि पूर्णाहुती, श्री सत्यदत्त पूजन असे विविध धार्मिक कार्यक्रम हाेणार आहेत. गुरूवारी (दि.4) श्रीदत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि.5) सत्यदत्त पूजन, सप्ताह सांगता नैवैद्य आरती, महाप्रसादाने सप्ताहाची सांगता हाेणार आहे.

दरम्यान, 5 डिसेंबर राेजी सकाळी 10 वाजता श्री स्वामी समर्थ चरित्र कथा ह. भ.प. गणेश महाराज करंजकर यांची प्रवचन सेवा हाेणार आहे, अशी माहिती स्वामी सेवा केंद्रातील सेवेक-यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *