Maval News : कला वाणिज्य व बीबीए महाविद्यालयात ‘निर्भय कन्या अभियान’ कार्यशाळा
Pckhabar- श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य व बीबीए महाविद्यालय व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी ‘निर्भय कन्या अभियान’ एक दिवसीय कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेसाठी पहिल्या सत्रात एडवोकेट वैशाली धोंगडे यांनी महिलांविषयी हक्क व कायदे याविषयी मुलींना मार्गदर्शन केले. त्यानंतर महिला पोलीस अधिकारी माननीय काजल आघाव यांनी कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात मुलींची सुरक्षितता आणि निर्भया पथक याविषयी मुलींना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात अपेक्षा गुजर यांनी मुलींना स्वसंरक्षण व कराटे प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक गायकवाड यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर शितल दुर्गाडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक रोहिणी चंदनशिवे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक महादेव वाघमारे, डॉ. जया धावारे, प्रा.मोहिनी ठाकर प्रा. सुप्रिया पाटोळे ,प्रा. सुरेखा केंगले, प्रा. सोनिया साळुंखे ,प्रा. आशिष शिंदे इत्यादी प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.










Leave a Reply