Talegaon Dabhade News: उद्या तळेगावात माेफत आराेग्य तपासणी शिबिर
यशवंत प्रतिष्ठान, पुष्पलता डी वाय पाटील हाॅस्पिटल आणि संसाेधन केंद्र आंबी यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन
Pckhabar- तळेगाव दाभाडे येथील यशवंत प्रतिष्ठान, पुष्पलता डी वाय पाटील हाॅस्पिटल आणि संसाेधन केंद्र आंबी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दि. 26 जानेवारी (साेमवार) माेफत आराेग्य तपासणी शिबिराचे आयाेजन केले आहे.
हे आरोग्य शिबिर तळेगाव दाभाडे येथील तपाेधाम काॅलनी, यशाेधाम सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत हाेणार आहे.
या शिबिरामध्ये अस्थिराेग तपासणी, स्त्रीराेग तपासणी, कान-नाक-घसा, बालराेग तपासणी, शस्त्रक्रिया सेवा माेफत केली जाणार आहे. तसेच रूग्णांना माेफत औषधेही देण्यात येणार आहेत.
इच्छूक नागरिकांनी शिबिराला येताना आधारकार्ड आणावे, असे आवाहन नगरसेवक निखिल भगत आणि यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. संविद पाटील यांनी केले आहे.

याबाबत नगरसेवक निखिल भगत आणि यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. संविद पाटील म्हणाले की,
शिबिरामध्ये अस्थिराेग तपासणी, स्त्रीराेग तपासणी, कान-नाक-घसा, बालराेग तपासणी, शस्त्रक्रिया सेवा माेफत केली जाणार आहे. तसेच रूग्णांना माेफत औषधेही देण्यात येणार आहेत. अत्याधुनिक मशीनच्या माध्यमातून रूग्णांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे परिसरातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही भगत आणि पाटील यांनी केले आहे.










Leave a Reply