Pimpri crime news: पीएमपीएमएल बसच्या धडकेत पादचारी ठार

ही बातमी शेअर करा.

Pimpri crime news: पीएमपीएमएल बसच्या धडकेत पादचारी ठार
Pckhabar-बीआरटी मार्गातून रस्ता ओलांडणार्‍या एका पादचार्‍याला पीएमपीएमएल बसने धडक दिल्याने पादचार्‍याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी येथे घडली.
नितीन भिमराव घिगे (वय-25, रा. घिगेवाडी, अहमदनगर) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी सचिन भिमराव घिगे (वय-30) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालक दत्त्तात्रय मधुकर आंबेकर (वय-47, रा. मोरेवस्ती, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ नितीन हा पुणे-मुंबई महामार्गावरील फुगेवाडी चौकातून रस्ता ओलांडत होता. यावेळी  भरधाव आलेल्या   (एमएच 14, एच.यु 5029) या पीएमपीएमवरील चालकाने नितीनला जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नितीनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फौजदार शिखरे तपास करत आहेत.


ही बातमी शेअर करा.