Bhosari news : फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज राबविणार ‘मेक इन उद्योजक’अभियान

Bhosari news : फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज राबविणार ‘मेक इन उद्योजक’अभियान
Pckhabar-राज्यातील उच्चशिक्षित तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन ‘मेक इन उद्योजक’अभियान राबविणार असल्याचे  फोरम ऑफ ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.
पुणे विभागाचे जिल्हा उद्योग केंद्राचे संचालक सदाशिव सुरवसे यांच्याशी फोरमचे अध्यक्ष भोर यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी देखील या अभियानात सामील होऊन उद्योगांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. सुशिक्षित उच्चशिक्षित तरुणांची संख्या मोठ्या संख्येने बेरोजगारीचा सामना करत आहे. सुशिक्षित तरुणांना उद्योग क्षेत्रात उद्योजक बनविण्यासाठी असोसिएशनतर्फे प्रयत्न करण्यात येणार असून सरकारच्या अनेक योजनांचा उपयोग या तरुणांना उपयोग होऊन छोटे उद्योजक निर्माण होतील. या तरुणांकडे शिक्षण आहे, परंतु काम नाही कुठल्याही कामाची कायमस्वरूपी काम मिळेल याची शाश्वती नाही. म्हणून सर्वात जास्त उच्चशिक्षित तरुण आज बेरोजगारीचा सामना करत आहे. त्यामुळे  आज अनेक पालक देखील चिंताग्रस्त अवस्थेमध्ये जगत आहेत. कोरोना सारखे संकट देशावर आल्यामुळे त्यामध्ये अजून भर पडली आहे. अनेक शिक्षित तरुण चिंताग्रस्त वातावरणामध्ये असून काही तरुण आत्महत्या अनेक शिक्षित तरुण चिंताग्रस्त वातावरणामध्ये आहे. या तरुणांना फोरम तर्फे मार्गदर्शन करून त्यांना उद्योजक बनविण्यासाठी आणि महाराष्ट्रातील मेक इन महाराष्ट्र ही संकल्पना वास्तवात आणण्यासाठी फोरम ऑफ ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन मार्फत मार्गदर्शन केले जाईल. जागा भांडवल आणि उद्योगाबाबत माहिती देऊन सर्व प्रकारे मदत केली जाईल. बेकारीवर मात करण्यासाठी आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.