Pimpri news : काँग्रेस शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांच्या उद्या मुलाखती
Pckhabar-पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा 11 नोव्हेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणार्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व पिंपरी चिंचवड निरीक्षक राजेश शर्मा आणि नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष व पिंपरी चिंचवड निरीक्षक शरद आहेर हे उद्या (मंगळवार) दुपारी 11 ते 2 या वेळेत निगडी प्राधिकरण येथील हरीदास नायर यांच्या कार्यालयात (सेक्टर 27, अॅक्सिस बँक जवळ) इच्छुकांच्या मुलाखती घेतील.
कोरोनाबाबत सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करावे. मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर पाळावे, सॅनिटायझर वापरावे सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन शहर काँग्रेसने केले आहे.












Leave a Reply