Dehu News : सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

Dehu News : सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

Pckhabar- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनाम प्रेम संस्थेचे उपसंचालक डॉ. प्रकाश शेठ तसेच वाचन वेड संस्थेचे प्रमुख श्री. किरिटी मोरे व सौ.भारती मोरे उपस्थित होते. तसेच वसंतराव झेंडे, सृजन फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार ॲड. संजय भसे, श्री डोळसनाथ पतसंस्थेचे सदस्य गणेश बोडके, नितीन बोडके, विजय भेगडे, प्रगतशील शेतकरी भागुजी काळोखे, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, उपाध्यक्ष अशोक कंद आदी मान्यवरही याप्रसंगी उपस्थित होते.
७५ व्या ध्वजवंदन सोहळ्याचे औचित्य साधून वर्षभर शाळेत झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते व पालकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी इन्ड्युरन्स स्केटिंग ऑर्गनायझेशन तर्फे आयोजित राज्य पातळीवरील स्केटिंग स्पर्धेत शाळेतील सहभागी विद्यार्थ्यांपैकी इयत्ता चौथीतील श्लोक थिटे ची राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. तसेच पिंपरी-चिंचवड स्कूल ऑलिंपिया स्केटिंग आणि स्किपिंग रोप स्पर्धेतही बाजी मारत शाळेतील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविल्या बद्दल त्यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. रेसिटेशन काॅम्पिटिशन, फॅन्सी ड्रेस काॅम्पिटिशन, ग्रिटिंग कार्ड मेकिंग काॅम्पिटिशन, स्किपिंग रोप काॅम्पिटिशन व हिंदी हस्ताक्षर प्रतियोगिता यांसारख्या विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या संकल्पने अंतर्गत ‘लिहिते व्हा’ या पालक निबंध स्पर्धेचे विजेते यावेळी घोषित करण्यात आले. विजेत्या पालकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांक सौ.अश्विनी पवन पाटील व श्री.पवन हिंदूराव पाटील, द्वितीय क्रमांक सौ. वंदना दशरथ मारणे व श्री. नवनाथ आनंदा पाटील तर तृतीय क्रमांक सौ. अमृता संदीप शेंडगे यांना देण्यात आला. बक्षीसपात्र निबंध शाळेचा वार्षिक अंक ‘सृजनदीप’ मध्ये प्रसिद्ध केले जातात.

शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी स्केटिंग आणि जिमनॅस्टिकची सुंदर प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृजन फाउंडेशन चे सचिव प्रा.विकास कंद यांनी केले तर सहशिक्षिका मंगला नाठे यांनी आभारप्रदर्शन केले. सहशिक्षिका निकिता खरात व सहशिक्षक सिद्धेश भिसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.