रिक्षा चालकाने प्रवाशाचे फोडले डोके

ही बातमी शेअर करा.

रिक्षा चालकाने प्रवाशाचे फोडले डोके
Pckhabar- भाड्याच्या पैशावरून रिक्षा चालकाने प्रवासी ग्राहकासोबत अरेरावी करत त्याच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. ही घटना  तापकीरनगर, काळेवाडी येथे घडली.

विशाल भास्कर शेंडगे (वय 28, रा. तापकीरनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अजीज आयुब शेख (रा. तापकीरनगर, काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी विशाल त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत आरोपीच्या रिक्षातून आले. विशाल यांनी रिक्षा चालक आरोपी अजीजला भाड्याचे 20 रुपये दिले. मात्र, अजीज याने आणखी 200 रुपये देण्याची मागणी केली. एवढे पैसे देण्यास विशाल यांनी नकार दिला असता अजीजने रस्त्यावर पडलेला दगड उचलून विशाल यांच्या डोक्यात घातला. यामध्ये विशाल जखमी झाले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.


ही बातमी शेअर करा.