Pimpri News: पिंपरीतील कन्या विद्यालयात सॅनिटरी नॅपकीनचे वितरण

Pimpri News: पिंपरीतील कन्या विद्यालयात सॅनिटरी नॅपकीनचे वितरण

Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आज ५ मे रोजी थेरगाव सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्याने आणि फर्ग्युसन कॉलेजच्या माध्यमातून शिक्षणा बरोबर विद्यार्थिनींचे शारीरिक , मानसिक आरोग्य देखील जपणे महत्त्वाचे आहे ही जाणीव ठेवून तरुण तडफदार मुलांनी ४०० सॅनिटरी नॅपकीनचे वितरण इयत्ता 8 वी व 9 वी च्या विद्यार्थिनींना केले.

या कार्यक्रमाचे वेळी यावेळी अतिथी अनघा घाटोळे,
– ॲक्टिव मेंबर रोबिनहूड आर्मी, वाकड पोलिस स्टेशन दक्षता आणि भरोसा कमिटी, कविन चौधरी – ड्राईव्ह हेड, फर्ग्युसन कॉलेज ,मानसी घाटोळे आणि अनुष्का फर्ग्युसन कॉलेज , वीणा कोंढेकर – वकील आणि मेंबर ऑफ वाकड भरोसा आणि दक्षता कमिटी, सीमा देशमुख – सामाजिक कार्यकर्त्या, हनुमंत नेवाळे – स्कूल कमिटी सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे पर्यवेक्षिका उर्मिला पाटील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी विद्यार्थिनींनीचे आरोग्य स्वच्छ व निरामय राहण्याचे दृष्टीने सामाजिक जाणीव ठेवून केलेले हे काम नक्कीच उपयुक्त आहे असे मनोगत व्यक्त केले आणि पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि कार्यवाही सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका फिसरेकर प्रितम यांनी केले व कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *