Pimpri News: कन्या विद्यालयात विविध उपक्रम

Pimpri News: कन्या विद्यालयात विविध उपक्रम

Pckhanar- पिंपरी येथील कन्या विद्यालयात काल शुक्रवार दिनांक 31 मार्च 2022 रोजी विद्यार्थिनीना रक्तक्षय या आजाराविषयी माहिती देण्यात आली. तसेच यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम, सर्व विद्यार्थिनींची एच बी तपासणी करण्यात आली. हिमोग्लोबिन वाढण्यासाठी त्यावरील उपाययोजना म्हणून रक्तवाढीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच पूरक आहाराविषयी माहिती देण्यात आली. व्यायामाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी झोप याविषयीचे महत्व तसेच मेडिटेशन का आणि कसे करावे याविषयीचे मार्गदर्शन जिजामाता हॉस्पिटल पिंपरी येथील मेडिकल ऑफिसर डॉ. वैशाली भामरे यांनी केले. त्यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदाताई शेटे तसेच पर्यवेक्षिका उर्मिला ताई पाटील उपस्थित होत्या.

इयत्ता पाचवी व आठवी या वर्गातील विद्यार्थिनींना स्कॉलरशिप परीक्षा याविषयीचे मार्गदर्शन नारायणराव सणस विद्यालयातील उपशिक्षक श्री मोरे एम जे.यांनी केले. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त भाषा अतिशय महत्त्वाच्या टिप्स स्पष्ट केल्या विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता आज दिवसभर स्कॉलरशिप चे मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *