Pimpri Educational News: शासकीय चित्रकला ग्रेड स्पर्धेत कन्या विद्यालयाला घवघवीत यश

Pimpri Educational News: शासकीय चित्रकला ग्रेड स्पर्धेत कन्या विद्यालयाला घवघवीत यश


Pckhabar- महाराष्ट्र राज्य कला संचालनालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कन्या विद्यालया मधील विद्यार्थ्यांनीनी या परीक्षेत कौतुकास्पद यश संपादन केले आहे. इंटरमिजिएट परीक्षेत एकूण 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 100% टक्के लागला आहे .

त्यामध्ये B ग्रेड मध्ये 11 विद्यार्थिनी पास असून C ग्रेड मध्ये 9 विद्यार्थिनी पास झाल्या आहेत . तसेच एलिमेंटरी परीक्षेमध्ये एकूण 12 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले असून याही परीक्षेचा 100% टक्के निकाल लागला आहे.यामध्ये B ग्रेड मध्ये 3 विद्यार्थीनी पास झाल्या असून C ग्रेड मध्ये 9 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. ग्रेड परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एस .एस .सी .बोर्ड परीक्षेमध्ये बोनस गुण मिळणार आहेत .त्यामुळे या परीक्षेचे विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थीनी मध्ये आनंदाचे वातावरण आहे .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक वाघमारे G.L. व शेख Y.S.व विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका शेटे एस.एस. व विद्यालयाच्या पर्यवेक्षिका पाटील यु. बी.यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थिनींचे विभागीय अधिकारी रत्नपारखी के .डी. व सहाय्यक विभागीय अधिकारी पवार एस.टी. व स्थानिक स्कूल कमिटी स्थानिक सल्लागार समिती तसेच सर्व शिक्षक – शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *