Bhosari News : युवकांवर श्रमसंस्कार रुजविणे काळाची गरज: प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया

Bhosari News : युवकांवर श्रमसंस्कार रुजविणे काळाची गरज: प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया

Pckhabar- सध्याच्या आधुनिक काळात युवकांवर श्रमसंस्कार रुजविणे श्रमाची प्रतिष्ठा वाढविणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. भौतिक साधनांची उपलब्धता झाल्याने श्रमाऐवजी पैशांची प्रतिष्ठा वाढली आहे. पैशाची प्रतिष्ठा वाढू न देता. युवकांवर श्रमाचे संस्कार राष्ट्रीय सेवा योजने मार्फत होऊ शकतात असे प्रतिपादन भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ.अशोककुमार पगारिया यांनी केले.

प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत श्रमसंस्कार शिबीर कोहिनकरवाडी ता.खेड जि.पुणे येथे घेण्यात आले. शिबीराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबावेत असताना गावपातळीवरील समाज हा मुख्य घटक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी युवकांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा उपयोग ग्रामसुधारण्यासाठी करणे गरजेचे आहे. यासाठी युवकांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा उपयोग करावा असे प्रतिपादन केले. या समारोपाला गावच्या प्रथम नागरिक सरपंच वैशालीताई कोहिनकर, संस्थेचे उपाध्यक्ष मा. विलासशेठ पगारिया, प्राचार्य सदाशिव कांबळे ,राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.सुधाकर बैसाने, सहसमन्वयक प्रा.महालक्ष्मी शिरसाट, प्रशासकीय अधिकारी पांडुरंग भास्कर, डॉ. हनुमंत शिंदे, प्रा.सचिन पवार, प्रा.डॉ.विजय निकम, प्रा.रूपाली आगळे प्रा.राजेश कुंभार , आदी प्राध्यापक व्यासपीठावर उपस्थित होते.

संस्थेचे उपाध्यक्ष मा.विलासशेठ पगारिया, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बदलत्या जीवनशैलीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये श्रम करण्याची भावना कमी होत आहे. श्रम न करण्याची पोकळी भरून काढण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करीत आहे. शिबिरांमध्ये अनेक लोकोपयोगी कामे विद्यार्थ्यांनी पार पाडली या विद्यार्थ्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. असे गौरव उद्गार काढले.

उद्योजक व रोटरीयन मा. अजित वाळुंज आणि मा. अविनाश कोहिनकर यांनी शिबिरासाठी खूप परिश्रम घेतले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सरपंच मा.वैशालीताई कोहिनकर यांनी गेले सात दिवस गावाचा कायापालट करण्याचे फार मोठे काम या विद्यार्थ्यांनी केले. त्यांच्या ऋणातून मुक्त होणे कठीण आहे. हे विद्यार्थी संस्कारक्षम असून या विद्यार्थ्यांनी या गावांमध्ये जे श्रम केले. त्यांनी ग्रामस्थांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे . विद्यार्थ्यांनी आमच्या ग्रामस्थांची जबाबदारी वाढविली असून हे आव्हान आम्हा सर्व गावकऱ्यांना पेलावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात मी सुयश चिंतीते असे मत व्यक्त केले.

या शिबिरामध्ये वृक्षारोपण, लिंगभाव संवेदनीकरण, ग्रामस्वच्छता, ग्रामस्थांचे प्रबोधन, पोवाडा विविध गाण्यांमधून करण्यात आले. त्याचबरोबर या शिबिरामध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये डॉ.हनुमंत शिंदे यांनी जलसंधारणाचे महत्त्व प्रा.सचिन पवार यांनी आर्थिक साक्षरता, मा.श्री अविनाश कोहिनकर यांनी निसर्ग संवर्धन काळाची गरज या विषयांवर व्याख्यान दिले.

शिबीरामध्ये महाविद्यालयीन स्वयंसेवकाने सहभाग घेतला त्यामध्ये ऋषिकेश कुंभार, विक्रम कुटेकर, पूजा पवार, पूजा लोहार, अनिकेत ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

शिबीर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.सुधाकर बैसाने, सहसमन्वयक प्रा.महालक्ष्मी शिरसाट, प्रा. डॉ. हनुमंत शिंदे, प्रशासकीय अधिकारी प्रा.भास्कर पांडुरंग, प्रा. सचिन पवार, प्रा. प्रवीण म्हस्के, प्रा उमेश लांडगे, डॉ.स्वाती वाघ, प्रा विभा ब्राह्मणकर, प्रा रूपाली आगळे, प्रा राजेश कुंभार, प्रा. प्रशांत रोकडे ,नीतू सिंग यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *