Pimpri News: कन्या विद्यालयात देणगीतून दहा व्हाईट बोर्ड चे अनावरण संपन्न

Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयात आज sedibuz कंपनीच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून 10 व्हाईट बोर्ड देणगी स्वरुपात देण्यात आले. या कार्यक्रमास कंपनीच्या एक्झिक्यूटिव्ह असिस्टंट अर्चना नायर, शिवानंद नायर तसेच व्हाईट बोर्ड बनवणारे मालक सुधीर राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी सेडीबझ कंपनी चे मॅनेजिंग डायरेक्टर किरण देवलाळकर आणि अर्चना नायर तसेच सुधीर राजगुरू यांचे ऋण व्यक्त केले.
यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व सत्कार पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी विद्यालयात चालविल्या जात असणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली.सुधीर राजगुरू यांनी मनोगत व्यक्त करताना ‘रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य खूप महान असल्याचे नमूद केले व विद्यालयास सर्वतोपरी मदत करण्याचेही आश्वासन दिले’.

कंपनीच्या प्रतिनिधी अर्चना नायर यांनी मनोगतातून बोलताना कन्या विद्यालयाच्या कामकाजाचे कौतुक करून भविष्यात जेवढे जमेल तेवढी मदत करू असे सांगितले. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल साकोरे यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व अध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.















Leave a Reply