निगडीत वृद्ध महिलेला मारहाण करत सव्वा चार लाखांचा ऐवज पळविला

ही बातमी शेअर करा.

निगडीत वृद्ध महिलेला मारहाण करत सव्वा चार लाखांचा ऐवज पळविला
Pckhabar- दोन चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या हातावर छड्या मारून तिला जखमी केले. त्यानंतर तिच्या अंगावरील आणि घरातील सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळे, कॅमेरा, मोबईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार निगडी प्राधिकरणातील उच्चभ्रू सोसायटीत घडला.
याप्रकरणी हेमलता पाटील (वय 76, रा.  प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमलता यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांना एकुलती एक मुलगी आहे. मुलीच्या लग्नानंतर हेमलता त्यांच्या घरात एकट्याच राहत होत्या. सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हेमलता टीव्ही पाहत होत्या. त्यावेळी दोन अनोळखी चोरटे हेमलता त्यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसले. पाटील यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्या हातावर छडीने मारून जखमी केले. त्यानंतर चोरट्यांनी हेमलता यांच्या अंगावरील दागिने, घरातील सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळे, कॅमेरा, मोबईल आणि रोख रक्कम, असा एकूण चार लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.


ही बातमी शेअर करा.