Nigdi News : देशाच्या विकासामध्ये लघू उद्योगांचे मोठे योगदान : सीए जंबूसरिया 


Nigdi News : देशाच्या विकासामध्ये लघू उद्योगांचे मोठे योगदान : सीए जंबूसरिया
Pckhabar-देशाच्या विकासामध्ये सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचे ४०% योगदान आहे. कोरोना महामारीमध्ये हे उद्योग डबघाईला आले. अशा स्थितीत दि इन्स्टिट्यूट ऑफ़ चार्टर्ड आकौंटंट ऑफ़ इंडियाने(आयसीएआय) स्टार्ट अप समिती स्थापन करून उद्योजकांना दिलासा देण्याचे कार्य केले, असे उदगार
दि इंस्टीट्यूट चार्टर्ड अकौंटंट ऑफ़ इंडिया ( आयसीएआय) चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीहार जंबूसरिया यांनी निगडी येथे काढले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ़ चार्टर्ड आकौंटंट ऑफ़ इंडिया पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने पिं चिं शाखेचे माजी अध्यक्ष व कॉमर्सच्या ६० प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
दि इन्स्टिट्यूट ऑफ़ चार्टर्ड अकौंटंट ऑफ़ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल छाजेड,वेस्टर्न रीजनचे अध्यक्ष सीए मनिष गादीया,पिं चिं शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, उपाध्यक्ष विजयकुमार बामणे,सचिव/ खजिनदार शैलेश बोरे, कार्यकारी सदस्य संतोष संचेती,सिमरन लीलवाणी, पंकज पाटणी,सचिन बंसल आदी उपस्थित होते.

यावेळी पिंपरी चिंचवड शाखेचे माजी अध्यक्ष चंद्रकुमार छाब्रा,सुनील कारभारी,बबन डांगले,सुहास गार्डी, आमोद भाटे यांच्या सह  ६०सीए व्याख्यात्यांचा  सन्मान करण्यात आला.

सीए जंबूसरीया पुढे म्हणाले कि, इन्स्टिट्यूटकडून येत्या ३-४ महिन्यात सीए अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे. बदलेला अभ्यासक्रम हा ॲप्लिकेशन्स बेस्ड व के स्टडीज वर आधारीत असेल. बदलत्या तांत्रिक बदलाचे भान ठेवून सीए च्या विद्यार्थ्यांना अपग्रेड करणारा अभ्यासक्रम असेल. यासाठी कमिटीने  पालक,विद्यार्थी,सीए यांच्यात संवाद साधून समन्वय साधला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष चंद्रकांत काळे यांनी केले.

सूत्रसंचालन प्रतिमा भिसे यांनी तर आभार विजयकुमार बामणे यांनी मानले.