Bhosari Crime News : धक्कादायक,  विवाहितेला पाजले कोंबडीचे रक्त; मी तुला मुल देतो, असे म्हणत सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग

ही बातमी शेअर करा.

Bhosari Crime News : धक्कादायक,  विवाहितेला पाजले कोंबडीचे रक्त; मी तुला मुल देतो, असे म्हणत सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग
Pckhabar- बुवाबाजी करून पती, सासू आणि सासर्‍याने  विवाहितेला कोंबडीचे रक्त पाजले.  तसेच पती लैंगिक असक्षम असताना त्याचे लग्न लावून फसवणूक केली तर सासर्‍याने विवाहितेला मी तुला मुल देतो, असे म्हणत लगट करण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार भोसरी परिसरात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पती, सासू आणि सासर्‍याच्या विरोधात स्त्री अत्याचार, विनयभंग, जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती (वय 33), सासरा (वय 62), सासू (वय 53) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पीडित विवाहितेने  भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून रत्नागिरी येथे घर बांधण्यासाठी, घरखर्चासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी केली. विवाहितेवर बुवाबाजी करून तिला कोंबडीचे रक्त पाजले. आरोपी सासर्‍याने
विवाहितेला मी तुला मुल देतो, असे म्हणत लगट करण्याचा प्रयत्न केला. पतीकडे इंजिनिअरिंगची डिग्री असल्याचे लग्नाच्या वेळी सांगण्यात आले होते. मात्र त्याचे डिग्री पर्यंतचेही शिक्षण झालेले नाही. पती लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे माहिती असूनही सासू आणि सासर्‍याने त्याचे लग्न पीडित विवाहितेसोबत लावून फसवणूक केली. पतीच्या लैंगिक असक्षमतेबाबत विवाहितेने तिच्या आई, वडील व नातेवाईकांना सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी विवाहितेला मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.


ही बातमी शेअर करा.