Pimpri crime news: अभिनेता योगेश सोहोनीला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pimpri crime news: अभिनेता योगेश सोहोनीला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अभिनेता सोहोनी यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची घेतली भेट

Pckhabar- ‘ मुलगी झाली हो’  या मालिकेतील अभिनेता योगेश सोहोनीला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी आज (शुक्रवार) बेड्या ठोकल्या आहेत.

दरम्यान, आरोपीला सात दिवसात अटक केल्यामुळे अभिनेता सोहोनी यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेऊन आभार मानले.

योगेश सुरेश गिरी (वय-३७ वर्षे, रा. शिंदे प्लाझा, फ्लॅट नंबर ५०७, नरे आंबेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अभिनेता योगेश सोहोनी यांनी तळेगाव दाभाडे फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील  अभिनेता योगेश सोहोनीला  पुणे एक्सप्रेस हायवेवर सोमाटणे एक्झीट येथे
स्कॉर्पिओ चालकाने त्यांना हात दाखवून रोडच्या डाव्या बाजूस थांबण्यास भाग पाडले होते. स्कॉर्पिओ चालकाने तुझ्या गाडीमुळे माझे गाडीचा अपघात झाला आहे व एका इसमास दुखापत झाली आहे. अपघाताची पोलीसांकडे तक्रार करायची नसेल तर सव्वा लाख रूपये दे,  नाहीतर तुझ्यावर पोलीस केस होईल अशी भिती दाखवून शिवीगाळ करून, त्यास एटीएम मधुन ५०,०००/- रुपये रक्कम काढण्यास  भाग पाडुन पाडले. हे पैसे घेऊन आरोपी पसार झाला होता.

खंडणी विरोधी पथकातील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना, पोलीस अंमलदार, आशिक बोटके यास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अभिनेता योगेश सोहोनी यांना लुटणारा आरोपी योगेश गिरी हा असून  पाषाण सुसगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या.

आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण येथे चोरी, जबरी चोरी, खंडणी व फसवणुक असे १७ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त श्री. सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उप निरीक्षक महेंद्र पाटील व शाकीर जिनेडी तसेच पोलीस अमलदार अशोक दुधवणे, निशांत काळे, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, किरण काटकर, गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, संदीप पाटील, शैलेश मगर, आशोक गारगोटे, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली आहे.