Dehu News : युनिकेअर हाॅस्पिटलला ऑक्सिजन सिलेंडरची तातडीने गरज

Dehu News : युनिकेअर हाॅस्पिटलला ऑक्सिजन सिलेंडरची तातडीने गरज
Pckhabar- श्री क्षेत्र देहूगाव येथील युनिकेयर हॅास्पिटलमधील ऑक्सिजन सिलेंडर साठा संपत आला आहे. 1 तास पुरेल एवढाच साठा शिल्लक असून हाॅस्पिटलमध्ये 6 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे हाॅस्पिटलला त्वरित 15 ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वत्र कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना बेड, रेमडिसीवर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊ शकत नाही. देहूगाव परिसरातही दररोज 40 ते 50 कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.

देहूत सर्व सोयी युक्त असलेल्या युनिकेअर हाॅस्पिटलमध्ये गंभीर असलेल्या 6 कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन सुरू आहे. यातील 4 रुग्ण अति गंभीर आहेत. मात्र, हाॅस्पिटलकडे 1 तास पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनाने हाॅस्पिटलला त्वरित 15 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, यासाठी युनिकेअर हाॅस्पिटलचे संचालक डॉ. सुहास जोशी प्रयत्न करत आहेत.