Lonavala news: ‘झाडे लावा, झाडे जगवा’ घोषणेने लोणावळा शहराचा आसमंत निनादला

 

Lonavala news: ‘झाडे लावा, झाडे जगवा’ घोषणेने लोणावळा शहराचा आसमंत निनादला
Pckhabar-माझी वसुंधरा अभियानांतर्गत लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वृक्ष संगोपन दिंडीला लोणावळा शहरातील शाळा, विविध संस्था आणि नागरिकांनी उदंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला . रॅली दरम्यान देण्यात येत असलेल्या ‘झाडे लावा, झाडे जगवा’ तसेच ‘स्वच्छ लोणावळा , सुंदर लोणावळा , हरित लोणावळा’ या घोषणेने लोणावळा शहराचा आसमंत अक्षरशः निनादुन गेला होता.

लोणावळा शहरातील शाळांचे विद्यार्थी, विविध संस्थांचे कार्यकर्ते आणि नागरिक असे सुमारे १५०० जण महाराष्ट्रीयन पारंपरिक वेशभूषेत या वृक्ष संगोपन दिंडीत सहभागी झाले होते . पर्यावरण रक्षणासाठी आपण वृक्षारोपन करतो मात्र लावलेली झाडे जगविणे देखील तितकेच महत्ताचे आहे. त्यामुळे वृक्षारोपनासोबतच वृक्ष संवर्धन करण्या बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणं गरजेचे असल्याने लोणावळा नगरपरिषदेने वृक्ष संगोपन दिंडी हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला . गुरुवारी दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या हस्ते नारळ फोडून या दिंडी ची सुरुवात करण्यात आली.  

वृक्ष संगोपन दिंडीच्या सुरुवातीला गुरुकुल विद्यालयाने तयार केलेला चित्ररथ तर त्यानंतर व्ही.पी.एस. शाळेच्या मुलांनी हाती घेतलेली पालखी मार्गस्थ झाली. त्यांनतर क्रमाक्रमाने पारंपारिक वेषभूषा परिधान करून शळांचे विद्यार्थी व शिक्षक तसेच विविध सामाजिक संस्था , महिला लेझीम पथक , महिला मंडळे , भजनी मंडळे सहभागी झाली . दिंडी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळच्या जागेत बसविण्यात आलेल्या वसुंधरेच्या मूर्तीचे अनावरण नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा आरोही तळेगावकर , मुख्याधिकारी सुर्वणा ओगले शिंदे , आरोग्य समिती सभापती रचना सिनकर , नगरसेविका पुजा गायकवाड , ब्रिंदा गणात्रा , मंदा सोनवणे , संध्या खंडेलवाल , सुवर्णा अकोलकर , नगरसेवक राजु बच्चे , सुधिर शिर्के , देविदास कडू , दिलीप दामोदरे ,  निखिल कविश्वर , विशाल पाडाळे, शिवदास पिल्ले , माणिक मराठे , माजी नगरसेवक प्रमोद गायकवाड , बाळासाहेब जाधव , राजाभाऊ खळदकर , रामविलास खंडेलवाल , विनय विद्वांस यांच्यासह विविध मान्यवर , नगरपरिषद अधिकारी उपस्थित होते . 

दिंडीचा समारोप लोणावळा नगरपरिषद इमारतीसमोर झाला . याठिकाणी सर्व सहभागी नागरिक व मान्यवर यांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेतली तसेच यावेळी वृक्ष आरती देखील घेण्यात आली. याठिकाणी गुरुकुल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन पथनाट्य तसेच शिक्षकांनी एक सामूहिक पर्यावरण गीत सादर केले , तर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले . दिडी मध्ये विविध शाळांच्या मुलामुलींनी परिधान केलेल्या पारंपारिक वेषभूषा व घोषवाक्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते .