राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना रुग्णांसाठी पिंपरी महापालिकेकडे दिली रेमडेसिवीर इंजेक्शने

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना रुग्णांसाठी पिंपरी महापालिकेकडे दिली रेमडेसिवीर इंजेक्शने
Pckhabar- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना रोगावर सद्यस्थितीमध्ये प्रभावशाली ठरणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन पिंपरी चिंचवड शहरातील बाधित रुग्णांसाठी पिंपरी महापालिकेला दिली आहेत. आज 50 इंजेक्शन दिली असून आणखी देण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि वायएसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याकडे इंजेक्शन सूपूर्द केली.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना संसर्गांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दररोज सातशे ते आठशे कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झालेली आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रोगावर सद्यस्थितीमध्ये प्रभावशाली ठरणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्या ठिकाणी रेमडेसिवर इंजेक्शनस् देण्यात आली आहेत.

पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कोरोना बाधित गोरगरीब नागरीकांसाठी आज 50 इंजेक्शन दिली. अजूनही आणखी इंजेक्शन देण्यात येणार आहेत.