Pimpri crime news: पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना अटक

ही बातमी शेअर करा.

Pimpri crime news: पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना अटक
Pckhabar- बेकायदेशीरपणे आणि विना परवाना पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे बाळगणार्‍या दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई जाधववाडी-मोशी रोडवर करण्यात आली.
रणजित बापु चव्हाण (वय-26, रा. चापेकर चौक, चिंचवड), दत्तात्रय किसन गाडे (वय-35, रा. येलवाडी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक संदीप गोपीचंद पाटील यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आरोपी जाधववाडी-मोशी रोडवर पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खंडणी दरोडा पथकाच्या टीमने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 80 हजार रूपये किंमतीचे दोन पिस्तूल चार जिवंत काडतुसे असा 80 हजार 400 रूपयांचा ऐवज जप्त केला.


ही बातमी शेअर करा.