Dighi News : दिघी ई काँर्नर सेवा केंद्राचे खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन

ही बातमी शेअर करा.

Dighi News : दिघी ई काँर्नर सेवा केंद्राचे खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन
Pckhabar- दिघीत नागरिकांना विविध प्रकारचे शासकीय दाखले आणि महापालिका च्या सोयी सुविधा आँनलाईन पध्दतीने देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते समाधान कांबळे यांच्या दिघी ई काँर्नर सेवा केंद्राचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या उदघाटनप्रंसगी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की “तरूणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे त्यातून ही सर्व सामान्य लोकांची सेवा या माध्यमातून करता आली पाहिजे. या सेवा केंद्रातून नागरिकांना शासकीय दरात वाजवी सेवा देण्यात येईल.’ यावेळी भोसरी विधानसभा माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेविका आशा सुपे, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, ज्ञानेश आल्हाट, सचिन दुबळे, धनाजी खाडे, संजय धुमाळ, हरीभाऊ लबडे, पुंडलिक सैंदाणे, के के जगताप, संदीप सोनावणे, अमोल देवकर, रवि पोहरे,प्रंशात कु-हाडे, संतोष वाळके, रमेश साबळे, सुनिता रेंगडे, उषा शेळके, स्वाती लबडे, स्वाती कांबळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन समाधान कांबळे व सूत्रसंचालन सुनील काकडे तर आभार सामाजिक कार्यकर्ते वसंत रेंगडे यांनी मानले.


ही बातमी शेअर करा.