Chinchwad News : शिक्षक दिनानिमित्त अरविंद एज्युकेशन तर्फे शिक्षिकांची मोफत ब्रेस्ट कॅन्सर व ग्रीवेचा कॅन्सर तपासणी

ही बातमी शेअर करा.

Chinchwad News : शिक्षक दिनानिमित्त अरविंद एज्युकेशन तर्फे शिक्षिकांची मोफत ब्रेस्ट कॅन्सर व ग्रीवेचा कॅन्सर तपासणी

Pckhabar-शिक्षक दिनानिमित्त प्रयास संस्था आणि अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्तपणे महिला शिक्षकांसाठी ब्रेस्ट कॅन्सर व ग्रीवेचा कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, तसेच ज्युनिअर कॉलेजमधील महिला शिक्षिका, शिक्षकेतर महिला कर्मचारी आदींनी या शिबिराचा लाभ घेतला.
जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या आवारात आयोजित या मोफत शिबिरात 25 ते 60 वयोगटातील महिला शिक्षिका, कर्मचाऱ्यांनी आपली कॅन्सर तपासणी करून घेतली. यावेळी अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, मुख्याध्यापिका, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आदी उपस्थित होते.
यावेळी शिबिरामध्ये महिला तज्ज्ञाद्वारे शिक्षिकांची जनरल तपासणी, स्तनांची सोनोग्राफी, गर्भाशय मुखाची तपासणी, निर्धोक व वेदनारहित आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तपासणी करण्यात आली.
यावेळी प्रयास संस्थेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिक्षिकांना मार्गदर्शन केले. तसेच तपासणीत कुणाला कॅन्सरचे निदान झाले, तर पुढच्या सर्व आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत स्वरूपात करण्यात येतील, असा सल्ला दिला.
महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता या पद्धतीने वेळीच तपासणी झाली, तर योग्य औषधोपचारानंतर कर्करोग बरा होऊ शकतो, असा सल्लाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.


ही बातमी शेअर करा.