Nigdi News: क्रांतीज्योत मित्र मंडळाचा रौप्यमहोत्सवी वर्षाचा गणेशोत्सव

ही बातमी शेअर करा.

Nigdi News: क्रांतीज्योत मित्र मंडळाचा रौप्यमहोत्सवी वर्षाचा गणेशोत्सव

Pckhabar- रुपीनगर तळवडे येथील क्रांतीज्योत मित्र मंडळाच्या स्थापनेला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला.

मंडळाने या वर्षी ‘महाराष्ट्राची संतपरंपरा’ हा स्थिर देखावा सादर केला. भव्य स्टेज आणि शेणाने सारवलेला सभामंडप, आकर्षक विद्युत रोषणाई, झाडांच्या कुंड्या, रांगोळी यामुळे वातावरणात सात्विकता आणि प्रसन्नता भरली गेली. सत्यनारायण पुजेनिमित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

मंडळाने यावर्षी विसर्जन हौदाचा अभिनव उपक्रम राबविला. घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी लोकांना जवळच सोय झाली आणि जलप्रदूषणाला आळा बसला. जवळपास 450 मूर्तींचे विसर्जन झाले.

सातव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत क्रांतीज्योत मित्र मंडळाचा 20 फुटी विठ्ठल रथ प्रमुख आकर्षण ठरला. भजनी मंडळ, शिवयोद्धा वाद्यपथकाचे ६१ ढोल आणि पुण्यातील मानाचा प्रभात बँड यांनी मिरवणुकीला रंगत आणली. रथावरील विद्युत रोषणाई आणि आतिषबाजी यांनी लक्ष वेधून घेतले. सालाबादप्रमाणे याहीवर्षी मंडळाने शिस्तबद्ध आणि आदर्श मिरवणूक काढली.मंडळाचे यावर्षीचे अध्यक्ष गोरख पाचपुते उपाध्यक्ष सुजित आरगिल,खजिनदार श्रीकांत भालेकर श्रीकांत भोसले,उत्सवप्रमुख- दर्पण येवले, बंटी कडलग,माऊली आडसुळ, संस्थापक-दिनकर भालेकर, सल्लागार सुयोग भालेकर राकेश बिराजदार,अजित भालेकर. आधारस्तंभ -अमोल तुकाराम भालेकर.


ही बातमी शेअर करा.