Pimpri crime news: निवृत्त नौदल अधिकार्‍याच्या मुलीवर लग्नाच्या आमिषाने अभियंत्याकडून बलात्कार

ही बातमी शेअर करा.

Pimpri crime news: निवृत्त नौदल अधिकार्‍याच्या मुलीवर लग्नाच्या आमिषाने अभियंत्याकडून बलात्कार
Pckhabar- निवृत्त नेव्ही ऑफिसरच्या मुलीवर सुरक्षा दलातील एका अभियंत्याने लग्नाचे अमिष देऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीरजकुमार भारती (रा. खडकी मिलिटरी क्वार्टर्स, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मार्च 2017 पासून 8 डिसेंबर 2020 या कालावधीत कृष्णानगर चिंचवड, सीएमई दापोडी, खडकी येथील आरोपीच्या घरी, विमाननगर आणि हिंजवडी येथील हॉटेलमध्ये घडला आहे. आरोपी नीरजकुमारसुरक्षा दलात अभियंता आहे. तर पीडित महिलेचे वडील भारतीय नौदलात अधिकारी म्हणून कार्यरत होते. पीडितच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर सुरक्षा विभागाशी संबंधित कागदपत्रांची जुळवणी करतेवेळी पीडिता आणि आरोपी यांची ओळख झाली. आरोपीने पीडित महिलेसोबत लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यातून त्याने महिलेवर सीएमई दापोडी, खडकी येथील राहते घरी, विमाननगर, हिंजवडी येथील हॉटेलमध्ये नेऊन महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर महिलेशी लग्न न करता तिची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.


ही बातमी शेअर करा.