फिरायला गेलेल्या एकाचा मोबाईल हिसकावला

फिरायला गेलेल्या एकाचा मोबाईल हिसकावला
Pckhabar-फिरायला गेलेल्या एका व्यक्तीच्या हातातील दुचाकीवरून आलेल्या एकाने त्यांचा 50 हजार रूपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हिसकावला. ही घटना भोसरी, इंद्रायणीनगर येथे घडली.
राजेंद्र रंगनाथ कुलकर्णी (वय-48, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुलकर्णी हे इंद्रायणीनगर येथे वॉकींगसाठी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपीपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने त्यांच्या हातातील  50 हजार रूपयांचा सॅमसंग कंपनीचा नोट-10 हा मोबाईल हिसकावून पळ काढला. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *