‘गप्पा आरोग्याच्या’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यदायी टिप्स

ही बातमी शेअर करा.

‘गप्पा आरोग्याच्या’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यदायी टिप्स

Pckhabar-इस्लामपूर येथील ज्येष्ठ नागरिक शांती सेवा संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी “गप्पा आरोग्याच्या” यावर भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातील सेवानिवृत्त सहाय्यक संचालक डॉ. अंकुश जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

डॉ.अंकुश जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांना होणारे सामान्य आजार, त्यावर घ्यायची काळजी, ते होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी, ज्येष्ठानी कोणत्या नियमित तपासण्या कराव्यात?काय खावे? काय खाऊ नये? कोणता व कसा व्यायाम करावा? याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे डॉ.जाधव यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन आर.ए .पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पी. बी. कुंभार, बी. आर. लोहार,
शामराव मुळीक, शहाजी पाटोळे, चिटणीस काका इ.प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.

डॉ.जाधव व उपस्थितांचे प्रकाश जाधव यांनी आभार मानले.


ही बातमी शेअर करा.