Maval News: कविभुषण विठ्ठल दळवी यांचा आदर्श सेवा सन्मान पुरस्काराने गौरव

ही बातमी शेअर करा.


Maval News: कविभुषण विठ्ठल दळवी यांचा आदर्श सेवा सन्मान पुरस्काराने गौरव
Pckhabar- दारुंबरे शाळेतील सोमाटणे, कोथुरणे, गावचे सुपुत्र विठ्ठल रामू दळवी यांनी आपल्या सुंदर लेखनीतुन गेली तीन वर्षांपासून रात्रंदिवस थोर संताच्या विचारांची परंपरा जपत असून त्यांच्या या कार्याबद्दल सांगोला येथील दैनिक तुफान क्रांती वर्धापन दिनानिमित्त त्यांना आदर्श सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दळवी यांनी महाराष्ट्राची अस्मिता राखत, छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती सांगत कविसंमेलने , विधार्रथयांपुढे मांडत, आदर्श कविभुषण, कविवर्य, राष्ट्रीय साहित्य रत्न फिनिक्स असे 17, पुरस्कार मिळवत मावळचे नाव उंचावले आहे. मावळच्या विचारांच्या आदर्श ठेवत, समाजाला विचारांशिवाय पर्याय नाही, मराठी भाषा, पवित्र प्राचीन संस्कृतीची ,संताच्या ग्रंथाची, विचारांची झालेली हेळसांड ,वनयजीवांना न मिळणारी जागा, सिमेंटची वाढणारी जंगले, परकिय संस्कृतीच्या आहारी गेलेला मानव, अदृश्य कोरोनारुपी पृथ्वी वर झालेली मानवाची वाताहत पाहता मानवाने अक्षरशः पृथ्वी वर शरणागती पत्करली असून कोरोणारूपी शिकार होताना दिसत आहे.

सारं काही पाहता मानवाने पृथ्वीवर विचारच करणे सोडून दिले आहे, ढासळलेली देशाची अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था, जणु काय मानवाला दिलेला पृथ्वी ने एक इशाराच आहे.

यातुनच संताचे विचार खरे होताना मात्र दिसत आहे, असे अनेक प्रकारे समाजाची सेवा व्हावी असा समोर ठेवून संताच्या विचारांतुन देश घडावा, प्रत्येकानं संताच्या विचारांचा आदर्श ठेवावा.

दळवी यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन दैनिक तुफान क्रांती, सांगोला, वर्धापण दिनानिमित्त त्यांना आदर्श सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याबद्दल दळवी यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, माजी मुख्याध्यापक काशीनाथ निंबळे, श्रीम विधा गांधी, दत्तात्रय जाधव, पांडुरंग ठाकर, सुखदेव कंद, प्रसन्न कोतुळकर, विनोद गोरे, सुभाष तांबे, भगवंत चितळकर यांनी अभिनंदन केले आहे.


ही बातमी शेअर करा.