Dehugaon Crime News : आम्ही तुझ्यासारखे पोट भरायला आलो आहे काय? आम्ही गाववाले आहोत, असे म्हणत एकाच्या डोक्यात घातला दगड

ही बातमी शेअर करा.

Dehugaon Crime News : आम्ही तुझ्यासारखे पोट भरायला आलो आहे काय? आम्ही गाववाले आहोत, असे म्हणत एकाच्या डोक्यात घातला दगड
Pckhabar-गार्डनचा कपडा लावण्यावरून दोन शेजार्‍यामध्ये झालेल्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकाने कपडा लावण्यास विरोध करून तुझ्यासारखे  आम्ही काय पोट भरायला आलो आहे काय? आम्ही गाववाले आहोत, असे बोलून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच डोक्यात दगड घालून जखमी केले. तर तारेच्या कंपाउंटवरून सिमेंटचे खांब व दगड काढल्याचा जाब विचारल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकाला चौघांनी शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. धारधार हत्याराने हातावर मारून गंभीर जखमी केले. ही घटना देहूगाव येथील साईसृष्टीनगर, वडाचा माळ येथे शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली आहे.

गणपत रेवाप्पा धडके (वय-52, रा. साईसृष्टीनगर, वडाचा माळ, देहूगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पांडुरंग गंगाराम हगवणे (वय-72, रा. देहूगाव) यांच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी वडाचा माळ येथे शेजारी राहण्यास आहेत. फिर्यादी हे शुक्रवारी दोन मुलांसह घरासमोर खड्डे खोदत होते. त्यावेळी आरोपी हगवणे तेथे आला. आरोपीने ’तुम्ही खड्डे खोदू नका, तुमच्या बापाची जागा आहे का?’ असे म्हणाले. फिर्यादी आरोपीला म्हणाले  काका मी तुमच्या जागेवर काही करणार नाही. मी फक्त तुमची व आमची तोंडे एकमेकाला दिसू नये म्हणून गार्डनचा कपडा लावणार असल्याचे सांगितले. आरोपी हगवणे याने कपडा लावण्यास विरोध करून तुझ्यासारखे  आम्ही काय पोट भरायला आलो आहे काय? आम्ही गाववाले आहोत, असे बोलून शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याने त्यांचा शर्ट तारेच्या कंपाऊंटमध्ये अडकून फाटला. तसेच डोक्यात दगड घालून जखमी केले.

पांडुरंग गंगाराम हगवणे (वय-72, रा. देहूगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गणपत रेवाप्पा धडके (वय-52), ऋषीकेश गणपत धडके (दोघे रा. वडाचा माळ) यांच्यासह दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांच्या जागेत लावलेल्या तारेच्या कंपाऊंटच्या सिमेंटचे खांब व दगड का काढले याबाबत फिर्यादी यांनी आरोपींकडे विचारणा केली होती. यावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत ऋषीकेश व त्याच्या दोन मित्रांनी हाताने मारहाण केली. आरोपी गणपत धडके याने धारधार हत्याराने फिर्यादी यांच्या उजव्या हातावर मारून दुखापत केली.
दोन्ही घटनांचा देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.


ही बातमी शेअर करा.