Pimpri Corona news: आज कोरोना रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या अधिक

ही बातमी शेअर करा.

Pimpri Corona news: आज कोरोना रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या अधिक

2113 नवे रूग्ण, 95 जणांचा मृत्यू,
2 हजार 363 जणांना डिस्चार्ज

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या रूग्णांची संख्या कमी होत ऩसून शंभरजवळ हा आकडा गेला आहे. सोमवारी महापालिका हद्दती 2 हजार 102 तर हद्दीबाहेरील 11 असे 2 हजार 113 नवे रूग्ण आढळले आहेत. 95 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 363 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 17 हजार 495 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 92 हजार 784 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 3 हजार 92 तर हद्दीबाहेरील 1 हजार 557 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 9 हजार 844 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 7 हजार 156 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 2 हजार 78 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 287 घरांना भेटी देऊन 3 हजार 903 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 296 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 171 करण्यात आले आहेत. शहरात 3 लाख 18 हजार 845  जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान,  मृत झालेल्या केसेस सोमवारी कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे. मागील 24 तासात 11 जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.


ही बातमी शेअर करा.