Pimpri news: शहरातील शाळा, महाविद्यालये 14 मार्च पर्यंत राहणार बंद; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय

ही बातमी शेअर करा.

Pimpri news: शहरातील शाळा, महाविद्यालये 14 मार्च पर्यंत राहणार बंद; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय

Pckhabar-कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील शहरातील शाळा, महाविद्यालये 14 मार्च पर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने मागील रविवारी कठोर निर्णय घेतले. शाळा, महाविद्यालये 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. रुग्णवाढ कायम आहे. त्यामुळे आता 14 मार्च पर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे, पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर यांच्या उपस्थितीतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कोरोना परिस्थितीचा 10 मार्च रोजी आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.


ही बातमी शेअर करा.