नगरसेवक दत्ता साने यांना श्रध्दाजंली

पिंपरी : सोमवारी झालेल्या नलाईन सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली. तसेच साने यांचे नाव वायसीएम रुग्णालयातील कोविड लँब अथवा भोसरी रुग्णालयास द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची जुलै महिन्याची सर्वसाधारण सभा सोमवारी गुगल मीटद्वारे ऑनलाईन घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. महासभेत महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेनेचे राहूल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, माजी पक्षनेते एकनाथ पवार, माजी महापौर राहूल जाधव, माजी स्थायी सभापती सीमा सावळे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी स्व. दत्ता साने यांच्या सोबत काम केलेल्या अनेक आठवणींना उजाळा देत आपण एक लढवय्या कार्यकर्ता गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
दरम्यान, महापालिकेच्या भोसरी रुग्णालय अथवा वायसीएम रुग्णालयातील कोविड-19 लँबला स्व.दत्ताकाका साने यांचे नाव देण्याची मागणी यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यावर पक्षनेते ढाके यांनी सर्वपक्षीय बैठक घेवून त्यावर योग्य तो निर्णय घेवू या, असं आश्वासन यांनी दिले आहे.
फोटो- दत्ता साने नावाने