Article By Dr. Snehal kulkarni:
‘कर्तव्यदक्ष राहणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी’
Pckhabar-मी एक डॉक्टर ! पण मला आज एका भलत्याच विषयावर लिखाण करायची इच्छा झाली म्हणून हा सदर लेख.! काही चुकलं तर मारणार नाही ना मला? नाही …..काय ना ते आजकाल डॉक्टरांवर हात साफ करण्याची प्रथा आहे म्हणून अगदी सहजच विचारले ! माफ करा .
तर , माझा विषय आहे , Duty & rights (कर्तव्य आणि अधिकार )
हो आपलं ते “नागरिकशास्त्र” याचा छोटासा पुस्तक ….त्याचा अभ्यास केलेलाच की सर्वांनी . (मराठी माध्यमातील मुलांना कळेल)
खूपदा ऐकलं जाते की अरे !..म्हणजे काय अधिकारच आहे हा आपला, माझा ! वगैरे वगैरे. पण कर्तव्याबद्दल कुणीच काही बोलायला धजत नाही. साधारणतः एक उदाहरण द्यायचं झालं तर रस्त्यावरून गाडी चालवतांना फक्त ६० टक्के लोक हेल्मेट घातलेले दिसतात. त्यापैकी ४० टक्के लोकांनी यासाठी घातलेला असतो की पोलीस पकडतील म्हणून. म्हणजे जीवाची पण काळजी गव्हर्नमेंटनेच करावी.. हेल्मेट सक्ती केली तरच घालणार…सिग्नल वर वाहतूक पोलीस उभे दिसले तरच आम्ही सिग्नल पाळणार नाहीतर आम्ही मोकाट सुटणार. !..असो … तर, मुद्दा हा की आपण सर्वांनी सर्वप्रथम कर्तव्यदक्ष राहणे हि आपली नैतिक जबाबदारी आहे. ही समजून घायला हवी. म्हणजे मास्क घातला नाही तर अमुक अमुक दंड असे छोटे- छोटे आदेश प्रशासनाला काढण्यात प्रशासनाला वेळ वाया घालवावा लागणार नाही.
कर्तव्य आणि अधिकार ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून जेव्हा काही अधिकार मागणार असाल तेव्हा आपण आपली कर्तव्ये नीट निभावतो आहे का ? हा प्रश्न स्वतःला एकदा तरी नक्की विचारा. बाकी आपण सगळेच एक सुजाण नागरिक आहोतच.
Follow one 2H formula
Means, Early in the morning when you wake up & touch your feet on ground make sure today you are going to make heaven for yourself and others too. Not hell out of hevan for yourself and others.
डॉ. स्नेहल कुलकर्णी
लेखिका दंतरोग तज्ज्ञ आहेत.












Leave a Reply