Talegaon Dabhade news: ‘सायक्लोथॉन’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

ही बातमी शेअर करा.

 

Talegaon Dabhade news: ‘सायक्लोथॉन’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद
Pckhabar-“नित्य सायकलची कसरत, होईल स्वस्थ भारत” यास अनुसरून मेगा मावळ सायक्लोथॉन  रॅलीचे आयोजन तळेगावातील सर्व शैक्षणिक संस्था व लायन्स क्लब ऑफ तळेगाव कडून उत्साहाने करण्यात आले.

 पर्यावरण संरक्षण व उत्तम आरोग्य राखण्याच्या दृष्टिकोनातून समाजात जनजागृती करण्याच्या दृष्टीने विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्या सहभागातून एक ‘सायक्लोथॉन’रॅलीचे आयोजन तळेगाव शहरातील सर्व शैक्षणिक संस्थां व लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या सहकार्याने रविवारी करण्यात आले.

थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील या शाळेच्या प्रांगणात मधून या रॅलीस सुरुवात करण्यात  झाली. यावेळी प्रांतपाल अभय शास्त्री, दीपक शहा, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, आर्यन मँन विशाल शेटे, समीर शहा, प्रयोजक शैलेश शहा, प्रकल्प प्रमुख संदीप काकडे, प्रकाश ओसवाल, उद्यान निरीक्षक विशाल मिंड, पालक,शिक्षक, विद्यार्थी स्पर्धक, व लायन्स क्लब तळेगावचे सर्व सभासद मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

तळेगाव शहरांमध्ये नववर्षाच्या  या पर्वावर समाजात जनजागृती द्वारे नवचैतन्य निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनसाठी ४ सायकली देण्यात आल्या. सहभागी विद्यार्थ्यांना टी शर्ट, टोपी, प्रमाणपत्र, व ट्राफी संयोजकांकडून देण्यात आली. सुमारे एक हजार जणांनी या रॅलीमध्ये सहभाग दर्शविल्याचे प्रकल्प प्रमुख संदीप काकडे व प्रकाश ओसवाल यांनी सांगितले.

 

 

 


ही बातमी शेअर करा.