Dehuroad news: देहूरोड शिवसेनेतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 

Dehuroad news: देहूरोड शिवसेनेतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
Pckhabar- शिवसेना पक्षप्रमुख हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त देहूरोड येथील ऐतिहासिक नेताजी सुभाष चंद्र बोस चौकात जयंती साजरी करण्यात आली.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आर पी आय अध्यक्ष सुनील गायकवाड व व राष्ट्रवादी अध्यक्ष देहूरोड शहर यांच्यावतीने पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला माजी देहूरोड शहर राष्ट्रवादी अध्यक्ष मिकी कोचार, राजेंद्र तरस यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर  बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी शहराध्यक्ष देहूरोड श्रीकृष्ण दाभोळे व शिवसेना शहर प्रमुख भरत नायडू यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपशहरप्रमुख संदीप बालघरे, शिवसेना महिला आघाडी संघटक व कॅन्टोन्मेंट बोर्ड माजी प्रशासक श्रीमती सुनंदा आवळे, ज्येष्ठ महिला लक्ष्मी अक्का, राष्ट्रीय उत्सव समितीचे अमोल व्यवहारे, अशिष बंसल, राष्ट्रवादीचे नेते रेणू रेड्डी, धनराज शिंदे, गोविंद राऊत, काँग्रेस देहू रोड ब्लॉक अध्यक्ष देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य हजीमलांग मारीमुथूू, काँग्रेस महिला अध्यक्ष ज्योती वैरागर, राणी पांडियन उपाध्यक्ष वेंकटेश पोळी, अल्पसंख्याक सेलचे  गफुरभाई शेर, सायबु तेलुगु, आरपीआय कार्यकत इंद्रपाल रतू, राहुल गायकवाड, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अरुण जगताप, शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, देहूरोड समन्वयक अरुण गोंन्टे, शिवसेना देहूरोड सल्लागार  विलास हीनकुले, देवा कांबळे, सुरेश मुळे, विभाग प्रमुख  गणेश सावंत, शशिकांत सप्पागुरू, जयन नायर, शाखाप्रमुख संतोष बालघरे, लालचंद शर्मा, गणेश घोलप, राजू पंडित, नितीन जाधव, खरात साहेब, शहानुर काजी, कैलास करमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीकृष्ण दाभोळे व शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर चिंचोली  शिवसेना शाखेच्या वतीने येथे क्रिकेट टेनिस बॉल सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. शिवसेना व युवासेना नामफलक उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे व युवा सेना प्रमुख  अनिकेत घुले व महिला मावळ तालुका संघटक शैलाताई खंडागळे, देहू शहर प्रमुख सुनील हागवणे हे उपस्थित होते. माय बाल भवन अंध अपंग शाळा याठिकाणी खाऊचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *