Pune news: आता तुम्हालाही जेलमध्ये जाता येणार…!मंगळवारपासून सर्वसामान्यांना ‘येरवडा जेलचे व्दार’ खुले

Pune news: मंगळवारपासून सर्वसामान्यांना ‘येरवडा जेलचे व्दार’ खुले
Pckhabar-राज्यातील कारागृहे हे स्वातंत्र्य पूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. या ऐतिहासिक घटनांमधून प्रेरणा मिळावी, यासाठी कारागृहांमध्ये प्रिझन टुरिझम ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात पुण्यातील येरवडा कारागृहापासून जेल पर्यटन प्रकल्पाने होणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली.

येत्या २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईनद्वारे या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. 

राज्यातील पर्यटनाला एक वेगळा आयाम मिळणार आहे. कारण, तुरुंगामध्ये बंदिवान असेलल्या कैद्यांचे आयुष्य आणि तिथले वातावरण अनुभवण्याची संधी सामान्य माणसांना मिळणार आहे. पर्यटनाच्या विविध प्रकारांबरोबरच राज्यात कारागृह पर्यटनाला सुरुवात होणार आहे. भारतात अशा प्रकारचे पर्यटन सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. पुण्यातील येरवडा कारागृहामधून या पर्यटनाला सुरुवात होईल.

पुण्याच्या येरवडा कारागृहाला स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास लाभला आहे. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांसारख्या थोर स्वातंत्र्यसैनानींना याच कारागृहात बंदिवान करण्यात आले होते. अशा थोर नेत्यांना बंदिवान केलेले तुुरुंग पर्यटनासाठी खुले करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. शिवाय याच कारागृहाच्या आवारातील एका झाडाखाली महात्मा गांधी आणि डाॅ. बाबासाहेब आंबडेकर यांच्यामध्ये १९३२ साली पुणे करार झाला होता. हा परिसर देखील पर्यटानासाठी खुला करण्यात येणार आहे. यासाठी शालेल विद्यार्थ्यांकडून ५ रुपये, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून १० रुपये आणि सामान्यांकडून ५० रुपये आकारण्यात येतील.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *