Pimpri news: सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांची बदली

 

 

Pimpri news: सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांची बदली
Pckhabar- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत अमृतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबतचा आदेश गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी शुक्रवारी काढला आहे. पाटील यांची 18 जून 2019 रोजी पिंपरी आयुक्तालयात सहायक आयुक्त म्हणून रूजू झाले होते. अवघ्या दिड वर्षांत पुन्हा कोल्हापूर येथेच त्यांची नियुक्ती झाली आहे.

सहायक आयुक्त पाटील यांनी कोरोना कालावधीत पोलीस कर्मचार्‍यांसाठी उत्कृष्ट कार्य केले. त्यांनी कोरोनाबाधित पोलिस आणि अधिकार्‍यांसाठी रूग्णालयात बेड उपलब्ध करून दिले. त्यामुळे पाचशे पेक्षा अधिक कर्मचार्‍यांनी कोरोनावर मात केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *