Maharashtra news: रेणू शर्माने धनंजय मुंडे वरील बलात्काराची तक्रार घेतली मागे
Pckhabar-राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या गायक महिलेने धनंजय मुंडेंवर बलात्काराची तक्रार केली होती. ज्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले होते. त्याच तक्रारदार महिलेने आता यू-टर्न मारत आपली तक्रार मागे घेतली आहे. रेणू शर्माने (Renu Sharma) लेखी अर्ज देवून आपली तक्रार मागे घेतली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. पण पुन्हा ती तक्रार मागे घेण्यावरुन मागे फिरु नये म्हणजेच मी तक्रार मागे घेतली नाही असा दावा करू नये या करता पोलिसांनी तिला आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यास पोलिसांनी सांगितले होते.










Leave a Reply