Maharashtra news: सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीवर ग्रामविकास मंत्री म्हणाले…
Pckhabar-ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार असल्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता. आज निवडणूक निकालानंतर 1 महिन्याच्या आत सरपंचपदाचे आरक्षण काढणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वात जास्त ग्रामपंचायत जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीचा कारभार नागरिकांना आवडला आहे हे स्पष्ट दिसतंय. चंद्रकांत पाटील यांच्या खानापुरात शिवसेनेनं बाजी मारली आहे. भाजपच्या अनेक दिगग्ज नेत्यांच्या गावात पराभवाचा सामना करावा लागला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
याआधी ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाची सोडत जाहीर होत होती. आठ जिल्ह्यांमध्ये तशी सोडत जाहीर देखील झाली होती. मात्र सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार आणि खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे 14 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत निकालानंतर काढण्यात येणार आहे.










Leave a Reply