Maharashtra news:  आदर्श ग्रामपंचायत पाटोद्याचा धक्कादायक निकाल; पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव

 

Maharashtra news:  आदर्श ग्रामपंचायत पाटोद्याचा धक्कादायक निकाल; पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव
Pckhabar-संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा या आदर्श ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आला आहे.गेली पंचवीस वर्ष पाटोदा ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता असलेले माजी सरपंच व पाटोदा गावच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भास्कर पेरे पाटील यांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती.

 

नव्या लोकांना संधी मिळावी म्हणून आपण निवडणूक लढवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. असे असले तरी त्यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील ही निवडणुकीत उभी होती. परंतु तीन जागांसाठी मतदान झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आला तेव्हा अनुराधा पाटील या पराभूत झाल्याचा समोर आले आहे. त्यांच्याविरोधात असलेल्या उमेदवाराला २०८ मते मिळाली तर अनुराधा पेरे पाटील यांना १८३ मते मिळाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *