Maval news: कोर्ट मॅनेज करून देण्यासाठी अडीच लाखांची लाच घेताना महिलेला रंगेहाथ पकडले

ही बातमी शेअर करा.

Maval news: कोर्ट मॅनेज करून देण्यासाठी अडीच लाखांची लाच घेताना महिलेला रंगेहाथ पकडले
Pckhabar- प्रलंबित केसचा खटला तक्रारदारच्या बाजूने लावण्यासाठी कोर्ट मॅनेज करून देण्याचे सांगून एका खासगी महिलेने तक्रारदाराकडून तब्बल अडीच लाखांची लाच स्विकारली. लाच घेताना महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई देहूरोड येथे बुधवारी करण्यात आली.

शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय-29, रा. तळेगाव दाभाडे) असे लाच घेणार्‍या महिलेचे नाव आहे. गायकवाड यांच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची वडगांव मावळ जिल्हा न्यायालयात केस प्रलंबित आहे. आरोपी गायकवाड यांनी तक्रारदार यांना कोर्ट मॅनेज करून केसचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावून देण्याचे सांगितले. त्यासाठी अडीच लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाने सापळा लावून बुधवारी आरोपीला अडीच लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी महिलेला न्यायालयात हजर केले असता  20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


ही बातमी शेअर करा.