Mumbai news: धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर; पक्ष म्हणून निर्णय घेऊ: शरद पवार

ही बातमी शेअर करा.

  Mumbai news: धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर; पक्ष म्हणून निर्णय घेऊ: शरद पवार
Pckhabar-राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.

आता धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. कालपासून त्यांनी अनेक बड्या नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या आहेत. आता हे वृत्तसमोर येताच राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे. दरम्यान,या सर्व प्रकरणावर खा. शरद पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी साधलेल्या संवादात आपली स्पष्ट केली.


ही बातमी शेअर करा.