Maval news: नाणे, सातेत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रचारात शैलाताई खंडागळे यांचा सहभाग

ही बातमी शेअर करा.

Maval news: नाणे, सातेत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रचारात शैलाताई खंडागळे यांचा सहभाग
Pckhabar- नाणे आणि साते ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रचार सभेत शिवसेना महिला संघटिका आणि पुणे जिल्हा परिषद सदस्या मावळ शैलाताई खंडागळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.

नाणे व साते ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात मावळ तालुका शिवसेना समन्वयक रमेश जाधव, माजी नगरसेवक श्रीमती. सुनंदाताई आवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

याबाबत शिवसेना महिला संघटिका आणि पुणे जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे म्हणाल्या, मावळातील मतदार राजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मावळातील अनेक ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या भगव्यासह महाविकास आघाडीची सत्ता नक्कीच येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


ही बातमी शेअर करा.