Pimpri News: कोरोनाचे 15 हजार डोस शहरात दाखल

ही बातमी शेअर करा.

Pimpri News: कोरोनाचे 15 हजार डोस शहरात दाखल
Pckhabar- आरोग्य सेवा पुणे मंडळाकडून पिंपरी-चिंचवड शहरासाठी कोरोना लसींचे 15 हजार डोस आज (बुधवारी) पहाटे अडीच वाजता दाखल झाले आहेत. 16 जानेवारी 2020 पासून निश्चित केलेल्या 8 लसीकरण केंद्रावर आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे. महापालिकेकडे आजपर्यंत 17 हजार 792 आरोग्य सेवा देणा-या लाभार्थींची नोंदणी झालेली आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड -19 वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी शासनानकडून कोविड-19 लसीकरण 16 जानेवारी 2021 पासून सुरू करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. ही लस आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे.

लसीकरणासाठी यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, पिंपळेनिलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, तालेरा रुग्णालय व ईएसआयएस रुग्णालय अशी 8 लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण होणार आहे.


ही बातमी शेअर करा.