Pimpri news: 17 जानेवारीची पल्स पोलिओ लसीकरण मोहिम स्थगित

ही बातमी शेअर करा.

Pimpri news: 17 जानेवारीची पल्स पोलिओ लसीकरण मोहिम स्थगित

Pckhabar- शासन आदेशानुसार राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
दि.17 जानेवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. मात्र, ही पल्स पोलिओ लसीकरण मोहिम पुढील सुचना येईपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

17 जानेवारी रोजी होणारी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या लसीकरण विभागाचे सल्लागार (आर.सी.एच.) प्रदिप हलदार यांनी स्थगित केल्याचे कळविले आहे.  त्यामुळे शासन आदेशानुसार  शहरातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दि.17 जानेवारी 2021 रोजी होणार नसून ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. शासनाकडून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची पुढील तारीख प्राप्त झाल्यानंतर कळविण्यात येईल असे  पालिकेच्या वैद्यकिय विभागाकडून कळविण्यात येत आहे.


ही बातमी शेअर करा.