Lonavala news: ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’ अंतर्गत पर्यटन नगरीत ‘सायकल डे’

ही बातमी शेअर करा.


Lonavala news: ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’ अंतर्गत पर्यटन नगरीत ‘सायकल डे’
Pckhabar- पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळा शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी ‘माझी वसुंधरा माझा अभिमान’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’ 2021 अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने मंगळवारी सकाळी सायकल डे चे आयोजन करण्यात आले होते . सुमारे 800 हून अधिक नागरिक या उपक्रमात सायकली घेऊन सहभागी झाले होते . प्रसिद्ध सिनेअभिनेते सुनिल शेट्टी यांच्या हस्ते झेंडा दाखवत या सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला .

तिन गटात ही सायकल रॅली सोडण्यात आली यामध्ये लहान मुलाचा गट लोणावळा नगरपरिषद कार्यालय ते मावळा पुतळा , ठोंबरेवाडी , सिद्धार्थनगर व पुन्हा नगरपरिषद कार्यालय ह्या मार्गाने सोडण्यात आला . त्यानंतर महिला व मुलींचा गट नगरपरिषद कार्यालय ते मावळा पुतळा , पुढे रायवुड व भुशी धरण मार्गे आयएनएस शिवाजी गेट व पुन्हा नगरपरिषद कार्यालय तर पुरुष व युवकाचा गट नगरपरिषद कार्यालय ते मावळा पुतळा , कुमार चौक , मिनू गॅरेज मार्गे डॉन बॉस्को , तुंगार्ली , वलवण , नांगरगाव , भांगरवाडी मार्गे पुन्हा नगरपरिषद कार्यालय असा सोडण्यात आला.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव , उपनगराध्यक्ष सुधिर शिर्के , मुख्याधिकारी रवि पवार , नगरसेवक राजु बच्चे , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व प्रमोद गायकवाड , भाजपाचे गटनेते देविदास कडू , काँग्रेसच्या गटनेत्या आरोही तळेगावकर , निखिल कविश्वर , विशाल पाडाळे , ब्रिनदा गणात्रा , मंदा सोनवणे , रचना सिनकर , सुवर्णा अकोलकर, संध्या खंडेलवाल , दिलीप दामोदरे, माणिक मराठे , शिवदास पिल्ले , भाजपाचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांच्यासह लोणावळा सायकल क्लबचे सदस्य , शिवदुर्ग मित्र , मावळ वार्ता फाऊंडेशनचे सदस्य , लोणावळा शहर मराठी पत्रकार संघ आदी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते .

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहराने सलग तीन वेळा देशात क्रमांक मिळवत हॅट्रिक केली आहेम यावर्षी लोणावळा शहर प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे . सोबतच राज्य शासनाच्या माझी वसुंधरा माझी जबाबदारी ही मोहिम देखील शहरात यशस्वीपणाने राबविण्यासाठी नगरपरिषदेने कंबर कसली आहे . याकरिता जमिनीची धुप रोखण्यासाठी वृक्षारोपन मोहिम , ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी नो हॉर्न प्लिज हा उपक्रम व आता शहरातील वायु प्रदुषण रोखण्यासाठी आठवड्यातील एक दिवस नो व्हेकल डे जाहिर करण्यात आला आहे . याबाबतची जनजागृती करण्यासाठी आजची सायकल रॅली आयोजित केली असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी रवि पवार यांनी सांगितले .

आठवड्यातील एक दिवस नागरिकांनी वाहने न वापरता सायकलचा वापर करावा अथवा पायी प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे . सायकल डे च्या रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांना नगरसेवक राजु बच्चे , माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड , नगरसेविका पुजा गायकवाड यांच्या वतीने मेडल देण्यात आले तसेच टी शर्ट व टोप्याचे वाटप नगरपरिषदेकडून करण्यात आले .


ही बातमी शेअर करा.