Chinchwad news: ‘डीम्ड कन्व्हेअन्स’ ची माहिती देण्यासाठी उद्या चिंचवडमध्ये चर्चासत्र

ही बातमी शेअर करा.

Chinchwad news: ‘डीम्ड कन्व्हेअन्स’ ची माहिती देण्यासाठी उद्या चिंचवडमध्ये चर्चासत्र
Pckhabar- पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील शेकडो गृहनिर्माण सोसायट्यांचे मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) बाकी आहे. जास्तीत जास्त सोसायट्यांनी आपले मानीव अभिहस्तांतरण करुन घ्यावे, यासाठी राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या वतीने उद्या गुरुवारी सायंकाळी पाच वाजता चिंचवड मधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्रात सहकार आयुक्त अनिल कवडे हे स्वत: नागरीकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणेचे सक्षम प्राधिकारी एन. व्हि. आघाव, उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर (3) शाहुराज हिरे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुणे शहर एन. ए. अनपट भोसले आणि ॲड. अंजली कलंत्रे आदी उपस्थित राहणार आहेत.

उपस्थित नागरीकांच्या वतीने या चर्चासत्राच्या समन्वयक शिल्पा देशपांडे या समन्वय साधतील. या चर्चासत्रात गृहनिर्माण संस्था आणि मानीव हस्तांतरण यांचे महत्व ( Importance), फायदे (Advantages), शासकीय तरतुदी, (Government Rules and Regulations), पुनर्विकास (Redevelopment) यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या शंकाचे, प्रश्नांचे निरसन करण्यात येणार आहे. सहभागी होऊ इच्छिणा-यांनी आपले प्रश्न लेखी स्वरुपात आणावेत. पिंपरी चिंचवड आणि मोशी, चिखली, च-होली को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन यांचे सहकार्य लाभले आहे.

 


ही बातमी शेअर करा.