Pimpri news: बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट; कावळे, पाणबगळे, कोंबड्या मृत्यूमुखी पडल्यास पालिकेला कळवा

ही बातमी शेअर करा.

Pimpri news: बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट; कावळे, पाणबगळे, कोंबड्या मृत्यूमुखी पडल्यास पालिकेला कळवा  
Pckhabar-ज्या व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबे पोल्ट्री फार्ममध्ये राहत आहेत.  जे कोंबड्यांची नियमीत देखभाल करत आहेत, अशा व्यक्तींना फ्लू सारखी लक्षणे आढळून आल्यास त्यांनी त्वरीत नजीकच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालय, दवाखान्यामध्ये संपर्क साधवा. तसेच कावळे, पाणबगळे अथवा कोंबड्यामध्ये अनपेक्षित मृत्यू झाल्याचे घटना दिसून आल्यास त्वरीत पालिकेच्या पशुवैद्यकिय विभागास, सारथी हेल्पलाईन 8888006666 या क्रमांकावर कळविण्यात यावे, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सध्या राज्यातील मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पक्षामध्ये बर्ड फ्लू आजाराचा विषाणू
आढळून आलेला आहे. बीड वगळता इतर जिल्हयांमध्ये एच5 एन1 हा विषाणू आढळून असून बीडमध्ये एच5 एन8 हा विषाणू आढळून आला आहे. या आजारामध्ये फ्लूसारख्या आजाराचे लक्षणे आढळून येतात. प्रामुख्याने अति जोखमीच्या व्यक्ती म्हणजेच  ज्या व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबे पोल्ट्री फार्म मध्ये रहात आहेत तसेच जे कोंबड्यांची नियमीत देखभाल करत आहेत अशा व्यक्तींना फ्लू
सारखी लक्षणे आढळून आल्यास त्यांनी त्वरीत नजीकच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालय, दवाखान्यामध्ये संपर्क साधनेबाबत अशा व्यक्तींना अवाहन करण्यात येत आहे.

पालिकेमध्ये एखाद्या परिसरात मोठ्या प्रमाणात कावळे, पाणबगळे अथवा कोंबड्यामध्ये अनपेक्षित मृत्यू झाल्याचे घटना दिसून आल्यास त्वरीत महानगरपालिकेच्या पशुवैद्यकिय विभागास, पालिकेच्या सारथी हेल्पलाईन
8888006666 या क्रमांकावर कळविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


ही बातमी शेअर करा.